🕒 1 min read
औरंगाबाद: नव्याने विकसित झालेल्या खाम नदीपात्रात नुकतेच आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आदित्य सरोवरचे लोकार्पण करण्यात आले. मात्र या सरोवराबरोबरच या ठिकाणी अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योगा लॉन्स, आदित्य सरोवर या प्रकल्पांचे ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र या दिलेल्या नावांवरून शहरात आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार अतुल सावे(Atul Save) यांनी आपण केंद्राकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. तर भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर(Sanjay Kenekar) यांनी शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे का असा सवाल उपस्थित करत हुजरेगिरीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पांडेयजींनी केलेली कमाल त्यांच्यावरच तर उलटणार नाही ना अशी चर्चा होत आहे.
२५ जानेवारी २०२२ रोजी खाम नदीच्या विकास कामाला एक वर्ष पूर्ण झाल्याने आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण करण्यात आले. मात्र याठिकाणी देण्यात आलेल्या उद्यान, सरोवरांच्या नावाची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. महापुरुष, राष्ट्रीय नेते, स्वातंत्र्य सेनानी यांची नावे आत्तापर्यंत अनेक मार्गांना पर्यटन स्थळाला दिलेली आपण पाहिली आहेत. मात्र शहरातील स्थानिक राजकारणातील पक्षातील नेत्यांची नावे देणे म्हणजे ‘कमाल करते हो पांडेयजी’ असेच पांडेय यांच्या बद्दल बोलले जात आहे.
भाजप आमदार अतुल सावे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, या प्रकाराची लेखी तक्रार आपण केंद्र सरकारकडे करणार असून अधिवेशनात देखील आपण हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी या कामांमध्ये महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी नगरपरिषद या संस्थांचे योगदान असतांना त्या सर्वांना सोडून नेत्यांची नावे का देण्यात आली. शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे का? या हुजरेगिरीविरोधीत विरोधात भाजप लवकरच आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
-
“बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम…”, ‘त्या’ निर्णयावरून दरेकरांचे टीकास्त्र
-
भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर संजय राऊत म्हणाले…
-
“तीन चाकी सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं”, आ. कीर्तीकुमार भांगडिया
-
“महाभकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा ‘हा’ निर्णय”, भातखळकरांचे टीकास्त्र
-
“हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?”, ‘त्या’ निर्णयावरून चित्रा वाघ यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
