मुंबई : विराटने कर्णधारपद सोडल्याच्या चर्चाना आता थोडा विराम लागला असून आता रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅट मध्ये कर्णधार म्हणून कशी कामगिरी करेल याची नव्याने चर्चा सुरु आहे. चाहत्यांनी तर आधीच सोशल मीडियावर मत व्यक्त केले आहे. मात्र आता काही माजी खेळाडूंनी याविषयावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. भारताचे माजी खेळाडू आणि निवडकर्ते सबा करीम यांनी नुकतेच रोहितला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद देणे धोक्याचे असल्याचे सांगितले आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी सांगितले ” रोहितला तिन्ही फॉरमॅटचे नेतृत्व जरी दिले गेले असले तरी हे तात्पुरत्या काळासाठी असणार आहे. भारतीय संघासमोर २०२३ चे विश्वचषक आहे, सोबतच त्याला डब्ल्यूटीसीच्या या टप्प्याचाही सामना करावा लागणार आहे. रोहितच्या फिटनेसचाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो. त्याने या सगळ्या गोष्टीं लक्षात घेता कोणाला तरी तयार करायला हवे. कारण सध्या त्याच्या शिवाय कोणीही पर्यायी नाहीये , ज्यामुळे रोहितचे तिन्ही फॉरमॅट मध्ये कर्णधार असणे संघासाठी धोकादायक आहे.” सबा करीम यांनी रोहितच्या कर्णधारपदाबाबत पुन्हा विचार केला जावे असेही यावेळी सांगितले आहे.
रोहित शर्मा कर्णधारपदाची नवी सुरुवात वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेत होणार आहे. कर्णधार म्हणून घोषणा झाल्यानंतर हि त्याची पहिली मालिका असेल कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी उपकर्णधार के एलने संघाची धुरा सांभाळली होती. मात्र भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेतील एकही सामना जिंकता आला नव्हता. तेव्हा के एलच्या नेतृत्वावर प्रशचिन्ह उपस्थित केले गेले होते. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेची सुरुवात ६ फेब्रुवारीपासून होणार आहे. ज्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी ट्वेन्टी सामने खेळवले जातील.
महत्वाच्या बातम्या
- संविधानाची पायमल्ली करीत हुकूमशाही ‘मविआ’ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही चपराक- गिरीश महाजन
- माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह बंगळुरूमध्ये आढळला, आत्महत्येचा संशय
- FIFA WC 2022 : वर्ल्डकप पात्रता फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा चिलीवर विजय
- अजिंठ्याची निसर्गसंपन्नता, वैभव पाहून आदित्य ठाकरेंनाही आवरला नाही मोह; कॅमेऱ्यात टिपली क्षणचित्रे!
- कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवू- अनिल परब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

