नवी दिल्ली: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (TV Actress Shweta Tiwari) हीने एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिने केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर श्वेता तिवारी हीच्या विरोधात पोलिसांमध्ये देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
श्वेता तिवारीच्या नवीन वेब सिरिजच्या लॉंच इवेंट मध्ये तिने एक वक्तव्यं केलं होतं. माझ्या ब्राचं माप देव (भगवान) घेतोय, असं वक्तव्यं तिने केलं होतं. या नंतर सोशल मिडियावर तिचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे पोलिसांमध्ये देखील तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण अधिक वाढू नये म्हणून श्वेता तिवारी हीने जाहीर माफी देखील मागितली आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातून तिने माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतु नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. पुढे ती म्हणाली की, माझं वक्तव्यं चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत आहे. मी स्वतः देवावर विश्वास ठेवते म्हणून मी असं वक्तव्यं कधीच नाही करू शकत. माझं वक्तव्यं नीट पडताळून पाहिलत तर समजेल की ‘भगवान’ हे सौरभ राज जैन यांनी केलेल्या त्या रोलच्या नावावरून मी ‘भगवान’ असं म्हणलं आहे. त्यामुळे माझं वक्तव्यं चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत असल्याचं देखील तिने यावेळी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
संविधानाची पायमल्ली करीत हुकूमशाही ‘मविआ’ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही चपराक- गिरीश महाजन
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह बंगळुरूमध्ये आढळला, आत्महत्येचा संशय
FIFA WC 2022 : वर्ल्डकप पात्रता फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा चिलीवर विजय
अजिंठ्याची निसर्गसंपन्नता, वैभव पाहून आदित्य ठाकरेंनाही आवरला नाही मोह; कॅमेऱ्यात टिपली क्षणचित्रे!
कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवू- अनिल परब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

