औरंगाबाद: श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थानाला ‘अ’ दर्जा प्राप्त करून देण्यासह मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने सर्वेक्षण करून सर्व शासकीय यंत्रणेने येथे खाते निहाय योजना राबविण्यासाठी नियोजनबद्ध सविस्तर आराखडा तयार करून येत्या महिन्याभरात शासनास परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थान येथे झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
तालुक्यातील धोत्रा येथील सिद्धेश्वर संस्थानच्या विकासासाठी मागील अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्याच पद्धतीने या अर्थसंकल्पात देखील मुर्डेश्वर संस्थानच्या विकासासाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांची घोषणा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. नैसर्गिक व आध्यत्मिक ठिकाण असलेल्या मुर्डेश्वर संस्थान परिसरात विविध विकास कामे करण्यासह येथे येणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा मिळावी, येथे पर्यटन क्षेत्र निर्माण व्हावे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासंदर्भात श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थान येथील सामाजिक सभागृहात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
गोळेगाव ते अंभई-आमठाणा रस्त्याची सुधारणा करणे तसेच आमठाणा ते संस्थान पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणे, मंदिराच्या प्रवेश द्वाराचे नव्याने बांधकाम करणे, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आदी विभागाने समनवय्याने मंदिर व परिसरात नैसर्गिक ऑक्सिजनला चालना देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे या कामांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून अंभई रस्त्यावरील खेळणा नदीवर पुलाचे बांधकाम करणे, सोयगाव कडून येणाऱ्या भाविकांसाठी डोंगररांगातून मंदिराकडे येण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम करणे, मंदिर परिसराला प्रकाशमय करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, नवीन सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी सर्वेक्षण करणे आदी विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करून येथे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढीसाठी व मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महत्वाच्या बातम्या:
संविधानाची पायमल्ली करीत हुकूमशाही ‘मविआ’ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही चपराक- गिरीश महाजन
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह बंगळुरूमध्ये आढळला, आत्महत्येचा संशय
FIFA WC 2022 : वर्ल्डकप पात्रता फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा चिलीवर विजय
अजिंठ्याची निसर्गसंपन्नता, वैभव पाहून आदित्य ठाकरेंनाही आवरला नाही मोह; कॅमेऱ्यात टिपली क्षणचित्रे!
कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवू- अनिल परब


