Share

‘कृत्रिम बहुमताने मिळालेली सत्ता…’; चंद्रकांत पाटलांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्यानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. पावसाळी अधिवेशनात गदारोळ केल्याने भाजपच्या १२ आमदारांना निलंबनाची मागणी राज्य सरकारने केले होते, मात्र हे निलंबन रद्द करण्यात आले आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच तोंडावर पडले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा शुक्रवारचा भाजपाच्या बारा निलंबित आमदारांविषयीचा निर्णय हा देशातील कोणत्याही सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. अशा प्रकारे एखाद्या सरकारने मनमानी केली तर लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचे मत न्यायालयाने सुनावणीत व्यक्त केले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आघाडी सरकारने घेतलेला बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे. कृत्रिम बहुमताच्या आधारे मिळवलेली सत्ता आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात इतकी चढली होती की न्यायालयालाही धुडकावून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने ते वागत होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आघाडी सरकारला धक्का बसला आहे, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!