🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर कमी अॅक्टिव्ह असली तरी केतकी आपल्या फोटोमुळे बरीच चर्चित असते. केतकी माटेगावकरने खूप कमी वेळात आपला चाहता वर्ग वाढवला आहे. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे.
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. केतकीच्या चाहत्यांना तिचा हा ही अंदाजही फार भावला आहे. केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतंय. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.
https://www.instagram.com/p/CKQSQ8sD-26/?utm_source=ig_web_copy_link
टाईमपास’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’ या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.
https://www.instagram.com/p/CKLILzyjH0B/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- ‘…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल खूप सन्मान आहे’
- मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन
- नागपुरमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; नाराज शिवसैनिकांचे पक्षप्रमुखांना पत्र
- ‘धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पक्षात काम करू करा’, रोहित पवारांचा सल्ला
- …आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल; पवारांचा राणेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
