मुंबई : मुंबईच्या घाटकोपर-मानखुर्द येथील लिंक रोडवरील नव्या उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद सुरू झाला आहे. मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब नाव द्यावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. याला भाजपने विरोध केला आहे.
तर, महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. काही वारकरी संघटनांसह भाजपने शेकडो वर्षांची परंपरा असलेला पायी वारीचा सोहळा काही निर्बंधांसह व्हावा, अशी मागणी केली होती. मात्र, पायी वारी नेण्यास परवानगी नाकारली असून मानाच्या १० पालख्या बसने पंढरपूरला जातील.
या दोन्ही मुद्द्यांवरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘वारीची परंपरा मोडीत काढणाऱ्यांनी टक्केवारीची परंपरा जोरात चालविली. महाआरती करणारे आता महावसुली करतात, आणि शिवरायांचे नाव घेणारे ख्वाजा गरीब नवाजचा आग्रह धरतात,’ अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पदं रिक्त पण शासन सुस्त ! प्रलंबित भरत्यांवरून भाजप युवा मोर्चाचे आक्रोश आंदोलन
- दिवस फिरले : चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवलं
- …तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवारांची पुणेकरांना तंबी !
- पाण्याच्या वादानंतर सोलापूरचे पालकमंत्री बदलणार ? जयंत पाटील म्हणाले…
- ‘मूक मोर्चाची मूका मोर्चा म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षाही नाही ‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

