Share

दिवस फिरले : चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवलं

Published On: 

🕒 1 min read

पटना – बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टीत सध्या जोरदार घमासान सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली असून, आता चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही हटववण्यात आलं आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चिराग यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहेत. चिराग यांनी ट्विट केले आहे की, ‘मी पापा आणि माझ्या कुटुंबाने बनवलेल्या या पार्टीला माझ्या कुटुंबासोबत ठेवण्यात प्रयत्न केला पण अयशस्वी ठरलो. पार्टी आईसारखी असते आणि आईची फसवणूक होऊ नये, असे मला वाटते. लोकशाहीमध्ये लोक सर्वोपरी असतात. पक्षावर विश्वास असणाऱ्या लोकांचे मी आभार मानतो. मी एक जुने पत्र शेअर करत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता चिराग पासवान यांना विरोधी पक्षांकडून तगड्या ऑफर येत आहेत. काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल या पक्षांनी चिराग पासवान यांना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एनडीएची साथ सोडून आमच्यासोबत या आणि विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करा, अशी ऑफर RJD आणि काँग्रेस आघाडीने चिराग पासवान यांना दिली आहे.

तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेही चिराग पासवान यांना आपल्यासोबत येण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रेमचंद मिश्रा यांनी, चिराग पासवान यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होऊन विरोधी पक्षाला आणखी मजबूत करावं असं म्हटलं आहे. आता चिराग पासवान नेमकी काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!