बुलढाणा : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली. उद्या म्हणजेच १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाआधी सबंध महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या दोन राजांची काल पुण्यात भेट झाली.
खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट झाल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील या भेटीच स्वागत करतानाच टीका देखील केली. ‘मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागतंच आहे. पण दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहे. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाही. तर मिठाला जागल्यासारखं ते बोलत आहेत,’ असं अरविंद सावंत म्हणाले.
मूक मोर्चाची मूका मोर्चा म्हणून खिल्ली उडवणार्यांकडून यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा पण नाही.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @BJP4Maharashtra pic.twitter.com/prSGIzRAMX
— Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) June 15, 2021
या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता आमदार श्वेता महाले यांनी या टीकेचा समाचार घेताना शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘मूक मोर्चाची मूका मोर्चा म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांकडून यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा पण नाही.’ असा घणाघात श्वेता महाले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- औंढा- जिंतूर मार्गावर ऑक्सिजन टँकर उलटला; दोन तास वाहतूक ठप्प
- पुणे पालिकेनी धाडली संजय काकडे आणि निलेश राणेंना नोटीस; थकवली तब्बल ८३ लाखांची पाणीपट्टी
- आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर, देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी…
- दहावी पास उमेदवारांना संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी
- लसीकरणामुळे देशात पहिल्या मृत्यूची नोंद; मोदी सरकारची कबुली


