Share

पाण्याच्या वादानंतर सोलापूरचे पालकमंत्री बदलणार ? जयंत पाटील म्हणाले…

Published On: 

पुणे : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणी प्रश्न पेटला होता. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळविण्याच्या निर्णायावरुन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरकरांमध्ये चांगलाच वाद पेटला. हा वाद वाढत असल्याचं लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय रद्द केल्याचं 19 मे रोजी जाहीर केलं होतं. मात्र, या वादामुळे सोलापूरचे पालकमंत्रीपद भरणे यांच्याकडून काढून कोणा दुसऱ्याकडे जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

यावर आता मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. दत्तात्रय भरणे हेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील, असं पाटील म्हणाले आहेत. ‘सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची मागणी झालेली नाही,’ असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

…तर राजकारणातून संन्यास घेईल – भरणे

पाण्याचा वाद सुरु असताना १० मे रोजी या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित पुण्यातील सिंचनभवनात दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात बैठक पार पडली होती. यावेळी बोलताना भरणे म्हणाले होते, एक ठिपका पाणीही सोलापूरचं घेणार नाही, मात्र इंदापूरला ही पाणी कमी पडू देणार नाही. सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्यास घेईन, आमदारकीचा राजीनामा देईन.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!