Share

‘मुख्यमंत्र्यापासून सर्व जण केंद्राच्या नावाने कांगावा करतात हे जनता पहात नाही अशा भ्रमात राहू नका’

Published On: 

मुंबई : राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही शासनाची तयारी आहे परंतू लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लगेच उद्यापासून लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या या सामबोधनावर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केली आहे. कालच मुखमंत्र्याच भाषण म्हणजे निव्वळ भुलभुलय्या, ना कोणती उत्तरं ना कोणती दिशा. १२कोटी लसी लगेच घेण्याच्या वल्गना पण त्या देण्याच्या व्यवस्थेचे काय? 5लाख लसीमहाराष्ट्रात दिल्याच नाहीत मग तरी घोषणा करण्यात कसली शेखी? बाते बडी बडी, काम का तो कूछ पता नहीं हे राज्यसरकारच वैशिष्ठ्य. असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.

तर, मदत होत आहे, कामे केली जात आहेत, अशी सगळी भाषा या लाईव्ह मध्ये होती. पण राज्यात १० लाख लसीकरणाची क्षमता आहे तर सांगितली का नाहीत? किती हज़ारांमागे केंद्र उभी केली, त्याची यादी, लस देण्यासाठी काययंत्रणा उभी केली आहे? १८ते४४ मध्ये परत वयाच्याअटी टाकणार की नोंदविल त्याला लस देणार? यातल्या एकाही प्रश्नांची उत्तर दिली नाहीत कारण नुसताच शब्दांचा फुलोरा करण्याची सवय या सरकारला लागली आहे. १२ कोटी लसी देण्यासाठी एक रकमी चेक देणारे इथल्या डॉक्टर, नर्सेंस, आरोग्य सेवात काम करण्याऱ्यांच्या समस्याकडे मात्र लक्ष देत नाहीत. असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

१५ दिवस कडक निर्बंध वाढवताना काही ठोस माहिती घेऊन येतील असे वाटले होते. 6 महिन्यांपूर्वी दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवणारे मुख्यमंत्री त्याची तयारी मात्र काहीच न करता केवळ हे सुरू ते सुरू अशी गोल गोल उत्तर देतात. रिक्षाचालकांना मदतीची जी घोषणा केली होती ती रक्कम देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, शेतकरी सगळेच मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशी टीका देखील केशव उपाध्ये यांनी केली आहे. तर दुसरीकडे रेमडेसीवर व आँक्सिजनचा साठा पुरेसा असल्याचे न्यायालयात राज्य सरकार सांगते मात्र मुख्यमंत्र्यापासून सर्व जण बाहेर केंद्र सरकारच्या नावाने कांगावा करतात हे जनता पहात नाही अशा भ्रमात कुणी राहू नये. असा प्रहार देखील केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!