Share

नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल; चाकूर आढावा बैठकीत तहसीलदारांचा इशारा

Published On: 

लातूर: कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र अजूनही कोरोनाचे संकट गेले नाहीये, त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन येथील स्थानिक प्रशासन करत आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव होत असल्याने ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी दिला. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत ते बोलत होते. गृहविलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगिकरण करण्यावर भर द्या, यासाठी ग्रामपंचायतीने उर्दू शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करावा. यामुळे गृहविलगीकरणात असतानाही बाहेर फिरणाऱ्या लोकांमुळे वाढत असलेला कोरोना रोगाचा प्रसार टाळता येईल, असेही यावेळी बिडवे म्हणाले.

गावातील १८ ते ४५ वर्षे व ४५ वर्षांवरील नागरिकांची यादी करून त्यात लस घेतलेले व न घेतलेले अशा याद्या कराव्यात. यामुळे लसीकरणावेळी मदत होईल. ग्रामपंचायत कार्यालयाने पोलीस विभागाच्या मदतीने जे दुकानदार / व्यापारी ठरवून दिलेल्या निर्बंधांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. जे वारंवार नियम मोडत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असा इशारा या वेळी तहसीलदार बिडवे यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!