Share

ऑनलाईन ई-पास मिळत नसल्याने नागरिक त्रस्त

Published On: 

औरंगाबाद : राज्यात लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतर अत्य आवश्यक सेवांना सुट देण्यात आली असुन त्यामध्ये खाजगी वाहनादेखील ईमरजन्सीसाठी ५० टक्के प्रवासी घेऊन जाण्यास शासनाने परवानगी दिली असता त्यासाठी ई-पास काढणे बंधनकारक आहे. परंतु ई-पास मिळत नसल्याने नागरिकांकडून प्रशासनाविषयी नाराजीचा सुर पसरत आहे.

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना ससर्ग आजाराने हाहाकार माजविला असुन या आजारामुळे सर्व जनजिवन विस्कळित झाले आहे. अनेकांचे रोजगार कायमचे गेले, तर काहींना नोकरी सोडाव्या लागलेल्या आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली असुन छोटे व्यवसाय करणारे पुर्णपणे अडचणीत सापडला आहे. या आजारामुळे लागलेल्या लाॉकडाऊनने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून बेरोजगारीही वाढली आहे.

गेल्या वर्षाचा लॉकडाऊन सपल्यानतंर थोड्याफार प्रमाणावर प्रवासी ये जा सुरू झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला होता. परंतु कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने पुन्हा लॉकडाउन घोषीत झाला अन् प्रशासनाने अत्याआवश्यक सेवांची दुकाने सुरु ठेवण्याची वेळ ठरवून दिली. तसेच वाहनधारकांना ५० टक्के प्रवाशी घेऊन जाण्याकरिता अर्ज भरुन शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर डाऊनलोड करायचा आहे. त्यानतंर वाहनधारकांना ई-पास मिळते. परंतु अनेक वाहन धारकांना ई पास मिळत नसल्याने प्रवासात अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!