Share

keshav upadhye | “पेंग्विन सेनाप्रमुखांना गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक कळत नाहीय”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  शिवसेना पक्षाचा काल मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसैनिकांसाठीचा मेळावा पार पडला. हा मेळावा दसरा मेळाव्याचा ट्रेलर असल्याचं बोललं जात आहे. तसेच या मेळाव्यामध्ये भाषण करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला होता. ठाकरेंनी शहा यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये ?

पेंग्विन सेनाप्रमुखांनी काल पुन्हा आपले पोकळ दंड पसरून त्याच गुळमुळीत आवेशाचे दर्शन घडवले. त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक त्यांना कळत नाहीये, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं की,अमित शहा हे गरुड आहेत. किमान तेवढा तरी फरत पहा.

उद्धव ठाकरेंची अमित शहांवरील टीका-

दरम्यान, भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पातशाह होते, आदिलशाह, निजामशाह होते. त्यांच्याच कुळातले शहा आत्ता काही दिवसांपूर्वी येऊन गेले. अमित शहा देशाचे गृहमंत्री ते काय म्हणाले की शिवसेनेला जमीन दाखवायची. आपल्याला जमीन दाखवायची आहे असं म्हणणाऱ्यांना आपण आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!