Share

देशातील जनतेने शांतता आणि सलोखा राखा : नरेंद्र मोदी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद खटला प्रकरणी आज अंतिम निर्णय लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई यांचे खंडपीठ सकाळी साडेदहा वाजता खटल्याचा निर्णय देतील. राम मंदिर आणि बाबरी मस्जिद खटला प्रकरणी देशभरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून देशात शांतता आणि सलोख राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात शांतता आणि सलोख राखण्याचे आवाहन केले आहे. ”अयोध्या खटल्याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो कोणाचेही यश किवा पराभव नसेल. ‘ देशातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की, देशातील शांतता, एकता आणि सद्भावनेच्या महान परंपरेला तडा जाणार नाही. ही आपली प्राथमिकता असणे आवश्यक आहे. ” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दरम्यान, तीन दशकांपासून रामजन्मभूमी वादामुळे देशात अनेक राजकीय चढउतार झाले. अनेक दशकांनंतर अखेर या प्रकरणावर अंतिम निकाल लागणार आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी झाल्यानंतर किमान तीन आठवडे या प्रकरणाबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे  गोगोई यांनी स्पष्ट केले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1193003428412133376?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1193005273805254656?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!