मुंबई : काल (२५ एप्रिल) मुंबईमध्ये ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच राम मंदिर बांधण्याचा आदेश कोर्टाने दिला, यांनी तर फक्त मंदिर उभारण्यासाठी झोळी पसरली, अशी टीकाही ठाकरेंनी केली.
यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘तुम्ही काय केलंत हिंदुत्वसाठी, राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुम्ही घेतलेला नाही, राम मंदिरचा आदेश कोर्टाने दिला आहे, यांनी तर मंदिर उभारण्यासाठी झोळी पसरली होती’, अशी अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केली.
दरम्यान, पुढे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतांना ठाकरे म्हणाले की,‘ताळतंत्र थोडसं सोडायला काय हरकत आहे. म्हणे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?बाबरी पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहांत तर तुमचे हिंदुत्व आहे कुठे?.’ तसेच घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये,आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?”, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल
- “बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीची किंमत नाही”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
- IPL 2022 PBKS vs CSK : धवनचा चेन्नईविरुद्ध ‘गब्बर’ खेळ; पंजाबनं ठोकल्या १८७ धावा!
- IPL 2022 PBKS vs CSK : धवन जोडीची कमाल..! चेन्नईचा अजून एक पराभव; पंजाबनं ११ धावांनी मारली बाजी!
- IPL 2022 PBKS vs CSK : ६ वर्षानंतर आयपीएल खेळणाऱ्या ऋषी धवननं का लावली होती face shield? वाचा कारण!


