Share

Ajit Pawar | दसरा मेळाव्यावरून अजित पवारांचं उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना आवाहन, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा शिवाजी पार्कवर. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. दसरा मेळाव्याला काही तासच राहीले आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये एकाच वेळेस दोन मेळावे होत असल्यामुळे संरक्षण व्यवस्थेवर ताण आला असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक वक्तव्य केलं आहे.

दसऱ्याच्या दिवशी त्या दोघांनी समंजस भूमिका घ्यावी. जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा अधिकार आहे. परंतू कुणाच्याहीबद्दल अनादराची भावना न दाखवता जी महाराष्ट्राची परंपरा आहे, तिला कुठेही बाधा लागणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही, कटुता वाढणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाने वागावं, असं आवाहन अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना केलं आहे. अजित पवार यांनी प्रसार माध्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना पवार असंही म्हणाले की, हे वाद आता इतके पराकोटीला गेले आहेत. त्यात कुणी पुढाकार घ्यायचा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शब्दानं शब्द वाढत जातो. एकानं आरे म्हटल्यावर पुढच्यानं कारे म्हणायचं. त्यातून ते इतकं खालपर्यंत जातं, की खालच्याही लोकांना वाटतं की आपण एकमेकांचे शत्रू झालो. असं नाहीये. तेवढ्यापुरतं आपापल्या भूमिका सांगण्याचं काम प्रत्येकानं करावं. पण एकदा राजकीय जोडे बाजूला ठेवले की सगळ्यांनी एकमेकांना सलोख्याच्या भावनेतून पाहावं.

शेवटी प्रत्येकाची काय भूमिका आहे, काय उद्दिष्ट आहे हेही महत्त्वाचं असतं. कुठलीही गोष्ट फार काळ टोकाची राहात नाही. जसजसे दिवस पुढे जातील, तशी त्यातली कटुता कमी होईल. तसे पवार यांनी असंही म्हटलं, अंधेरी (पूर्व) पोटनिवडणूक 13 नोव्हेंबरला लागली आहे. त्या निवडणुकीच्या निकालावरही सगळ्यांचं लक्ष राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरही बरंच अवलंबून राहील. चिन्ह गोठवलं जाणार का? हेही महत्त्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!