Share

Raj Thackeray | राज ठाकरे अयोध्येला जाणार? अयोध्येतील महंतांनी भेट घेत दिले निमंत्रण

Published On: 

मुंबई : अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदासजी महाराज, उदासीन आखाड्याच्या धर्मदास महाराज ह्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली व अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं. यापूर्वी राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता. विरोधकांनी आपल्याविरुद्ध सापळा रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर उत्तर भारतीयांचा अपमान केल्याबद्दल माफी मागितल्याशिवाय अयोध्येत जाऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ठाकरे यांना दिला होता.

मनसे पक्षाच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात, मनसे प्रमुखांनी उत्तर प्रदेश आणि बिहारसह उत्तर भारतीय राज्यातील स्थलांतरितांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मनसेने ‘मराठी माणसाला पाठिंबा देत २००८ मध्ये आंदोलन सुरू केले होते, त्यादरम्यान कल्याणमध्ये रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतातील उमेदवारांना मारहाण करण्यात आली होती.

अयोध्येतील महंतांनी राज ठाकरे यांची आज भेट घेतली व अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं

त्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. उत्तर भारतीयांबद्दल अपमानास्पद टिप्पणीसाठी, सिंह यांनी इशारा दिला की ठाकरे यांनी जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान आता अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिल्यामुळे राज ठाकरे अयोध्येला जाणार का हे पाहावे लागणार आहे.

हनुमान गढीचे महंत राजूदासजी महाराज, उदासीन आखाड्याच्या धर्मदास महाराज ह्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!