Share

अदर पुनावालांना ‘Z प्लस’ सिक्यूरिटी द्यावी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Published On: 

मुंबई – देशातील आघाडीची कोरोना लस उत्पादित कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांना बड्या राजकीय नेते आणि व्यवसायिकांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याबाबतचा गौप्यस्फोट स्वतः अदर पुनावाला यांनी मुलाखतीदरम्यान केला होता. यानंतर आता अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे.

वकील दत्ता माने यांनी ही याचिका केली असून यावेळी त्यांनी अदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.जर लसनिर्मिती करणाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम लसनिर्मितीवर होऊ शकतो असा दावा दत्ता माने यांनी याचिकेत केला आहे .

पुनावाला यांनी केलेल्या विधानांची दखल राज्य सरकारने घ्यावी आणि पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. तसेच या प्रकरणात तपास सुरू करुन न्यायालयात अहवाल दाखल करावा, असेही म्हटले आहे.

पूनावाला यांचे सिरम इन्स्टिट्यूट कोव्हिशिल्ड या कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ही लस आवश्यक आहे. सिरमने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी सीईओचे देशात असणे आवश्यक आहे. अन्यथा लसनिर्मिती मंदावेल. त्यामुळे पूनावाला व सिरमच्या संपत्तीचे रक्षण करावे, असेही याचिकेत नमूद आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!