औरंगाबाद : शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या बरोबरच लसीकरण देखील चांगल्या प्रकारे होत आहे. त्याचाच भाग म्हणून पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी बुधवार पासून पोलीस परीवारांसाठी लसीकरण मोहीम हाती घेत. पोलीस आयुक्तालयात लसीकरण केंद्र सुरु केले आहे. यात शहर पोलिस दलातील पोलीस परिवारांना लाभ घेता येणार आहे. आज केंद्रावर ७० पोलिस आणि त्यांच्या नातेवाईकांनी लसीकरण करून घेतले.
शासनाने लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली आहे. महाराष्ट्र राज्य लासिकारणात देशात पहिल्या स्थानी आहे. रात्रंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारे पोलीस २४ तास रस्त्यावर आहे. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला लसीकरण सोयीचे जाण्यासाठी पोलीस दलाला आयुक्तालय आणि टीव्ही सेंटर या दोन ठिकाणी केंद्र देण्यात आली आहे.
मिल कॉर्नर, क्रांती चौक या पोलीस वसाहतींसाठी आयुक्तालय केंद्र असणार आहे, तर पोलीस अधीक्षक कार्यालया जवळील वसाहतींसाठी टीव्ही सेंटर हे केंद्र असणार असल्याची माहिती पोलीस उपयुक्त मीना मकवाना यांनी दिली. बुधवार पासून या केंद्रांना सुरुवात झाली. दोन्ही केंद्र मिळून आज १४० जणांनी लस घेतली. ज्यात आयुक्तालय ७०, तर टीव्ही सेंटर येथे ७० लोकांनी लस घेतली.
पोलीस हॉस्पिटल द्वारे लसीकरणाची पोलीस वसाहती मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी काही टीमने हे काम सुरु देखील केले आहे. पहिल्यादिवशी पोलीस परिवारांचा उत्साह संमिश्र दिसून आला. तर सध्या ४५ वर्षांवरील पोलीस तसेच त्यांच्या परिवाराला येथे लस देण्यात येत आहे. आज पर्यंत शहर दलातील ८५ % पोलिसांनी पहिला तर, ५० % पोलिसांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती देखील उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला आयसीसीने केले निलंबीत
- ‘स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगा मोदी सरकारला आयुष्यभर छळतील’
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- ‘एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे एक निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!’
- ‘या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील’


