Share

Women’s WC 2022 : भारतीय संघाचा कांगारू विरुद्ध ६ विकेट्सने पराभव; चाहते गोलंदाजीवर संतापले

Published On: 

मुंबई: महिला विश्वचषकाच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २७८ धावांचे लक्ष्य ठेवले. शानदार फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ६ विकेट्सने सामना जिंकला. या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे टीम इंडियाची कमकुवत गोलंदाजी, ज्यामुळे टीम ट्रोल होत आहे.

अनुभवी भारतीय वेगवान झुलन गोस्वामीचा (jhulan goswami) २०० वा सामना होता. ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २७८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून कर्णधार मिताली राज (६८), यस्तिका भाटिया (५९) आणि हरमनप्रीत कौर (नाबाद ५७) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली. रॅचेल हेन्स आणि अ‍ॅलिसा हिली यांनी पहिल्या विकेटमध्ये १२१ धावा केल्या. अ‍ॅलिसा हिली आणि कर्णधार मेग लॅनिंगच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या सामन्यात भारताचा ६ गडी राखून पराभव केला.

https://twitter.com/HumanTsunaMEE/status/1505101711643340804?s=20&t=NvLjllRapL7o2MeFDwgDIA


https://twitter.com/VarunNaiyar/status/1415552080656277507?s=20&t=PzB4h3gLB_dGsoJglQThUw

भारताच्या पराभवानंतर क्रिकेट रसिक भारतीय महिला संघाच्या कामगिरीवर संतापलेले दिसले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अतिशय साधेपणाने कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताच्या जिंकलेल्या दोन सामन्यात गोलंदाजांचे मोठे योगदान होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर टीम इंडियाचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झालेल्या होत्या. सुरुवातीपासूनच भारताचा एकही गोलंदाज लयीत दिसत नव्हत्या. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!