मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काश्मीरच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भाजपला घेरले आहे. मागील काही दिवसांपासून काश्मीर कोऱ्यात विविध घडामोडी घडत आहेत. तेथील कायदा व सुव्यवस्था पुन्हा अतिसंवेदनशील बनले आहे. सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यावर हल्ले होत आहेत. काश्मिरी पंडितांमध्ये अस्वस्थता आहे. याच मुद्द्यावर आता संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
“जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घरात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारलं जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे, हत्या सुरु आहेत. यावर आता काश्मीर फाईल २ सिनेमा काढावा, यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं, ” अशी टीका संजय राऊतांनी केली.
“मोहनराव भागवत बरोबर बोलले मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. या देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये खासकरून जम्मू-काश्मीरमध्ये कश्मीरी पंडित पेक्षा, नागरिक हिंदू असेल किंवा मुसलमान असेल हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतो आहे. चित्रपटाचं प्रमोशन केलं जातं निर्मात्याने 400, 500 कोटी रुपये कमावले, काश्मिरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायन सुरू आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


