Share

सातारा जिल्ह्याचे कास पठार! अन् तेही औरंगाबादेत!

Published On: 

औरंगाबाद : सातारा जिल्ह्यातील कास पठाराचे आकर्षण दुरवर पसरले आहे. जगभरातील पर्यटक सातारा येथील कास पठाराला भेट देण्यासाठी येत असतात. याच धर्तीवर औरंगाबाद येथील म्हैसमाळ, गौताळा, शूलिभंजन व अजिंठा येथील परिसरात कास पठार उभे करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तज्ञाचे एक पथक हे माती परिक्षण व अभ्यास दौरा करणार आहे.

सातारा जिल्ह्यातील कास पठार च्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यात कास पठार उभे करण्यासाठी रानफुलांचे जतन व नविन प्रजातीची फुलांची लागवड याठिकाणी करण्यात येणार आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल. याद्वारे फुलपाखरांच्या प्रकल्पालाही हातभार लावणार असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी पठार उभारण्यात येणार आहे. या पठारावरील माळरानावर फुलांचे घनदाट ताटवे निर्माण करण्यासाठी २ क्किंटल ३७ किलो बियाणे जमा करण्यात आले आहे. हे पठार पर्यावरण पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांचा मानस आहे. या प्रकल्पासाठी स्थायी समितीच्या सभेत ५१ लाखांचा निधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!