Share

करुणा शर्मा यांना दिलासा मिळेना, कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

Published On: 

बीड : १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम लांबतच चालला आहे. कारण त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने पुढे ढकलली आहे. अर्जावर येत्या सोमवारी म्हणजे २० सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे अजून दोन दिवस तरी त्यांना कोठडीतच काढावे लागणार आहेत.

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी करुणा शर्मा यांना दि.५ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर एट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होऊन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर १४ सप्टेंबरला सुनावणी होऊ न शकल्याने १८ सप्टेंबरची तारीख देण्यात आली होती.

दरम्यान, ५ सप्टेंबरला करुणा परळीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या गाडीत बंदूक सापडल्याचेही समोर आले. तसेच हायव्होल्टेज ड्रामा घडून जिवे मारण्याची धमकी व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी करुणा मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. तसेच न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. या सर्व प्रकारामुळे राज्यभरात कोलाहल माजला होता.

त्यातच करुणा मुंडे यांच्याविरोधात एट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता २० सप्टेंबर रोजी होणार आहे. यामुळे करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्कात आता वाढला आहे. तपास अधिकारी प्रत्यक्षात हजर नसल्याने ही तारीख वाढवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!