🕒 1 min read
बीड : राज्यात शिवसेना पक्षाच्या दसरा मेळावा वरून राजकारण तापलं आहे. मुंबईतील दसरा मेळावा एकनाथ शिंदे घेणार की उद्धव ठाकरे यावरून दोन्ही गट आमने-सामने आले असून संघर्ष सुरू आहे. अशातच आता आणखीन एका दसरा मेळाव्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं करुणा मुंडे यांनी जाहीर केलं आहे.
भगवान गड येथे करुणा मुंडे दसरा मेळावा घेणारः
भगवान गडावरील मेळाव्याला ५० वर्षांची परंपरा आहे. स्वतः गोपीनाथ मुंडे येथे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. मात्र यंदाचा दसरा मेळावा हा धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचा दावा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी देखील स्पर्धेत आहे, मी भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ इच्छित आहे, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मी गेल्या 26 वर्षांपासून वंजारी समाजाची तसेच मुंडे घराण्याची सून आहे, मी देखील या स्पर्धेत असून दसरा मेळाव्याला भगवान गडावर माझं स्वागत करावं अशी विनंती करुणा यांनी महाराष्ट्राला केली आहे.
आनंदाची बाब म्हणजे माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडे हिचा त्याच दिवशी वाढदिवस आहेः
यादरम्यान, आनंदाची बाब म्हणजे माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडे हिचा त्याच दिवशी वाढदिवस आहे, त्यामुळे तिथे दसरा मेळावा घेणारच असा निर्धार करून मुंडे यांनी व्यक्त केला आहे. 2016 मध्ये गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी मेळावा घेण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला.
महत्वाच्या बातम्याः
- FCI Recruitment 2022 | युवकांना भारतीय खाद्य महामंडळासोबत काम करण्याची मोठी संधी..
- Ajit Pawar | राष्ट्रवादीतही भूकंप होणार? अजित पवारांच्या भूमिकेमुळे शरद पवार तणावात!
- SBI Recruitment २०२२ | भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५००८ जागा
- Ashish Shelar | महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड, आशिष शेलारांनी केलं ट्विट
- Eknath Shinde | पैठण येथील सभेनंतर एकनाथ शिंदेंनी शेअर केली पोस्ट, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
