🕒 1 min read
मुंबई : घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाकडे अक्षम्य दुर्लक्ष करून पर्यावरणास हानी पोहोचवल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र शासनाला १२ हजार कोटींचा जबर दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम दोन महिन्यांच्या आत भरावयाची आहे. या रकमेचा वापर फक्त कचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी केला जाणार आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे.
आशिष शेलार यांचं ट्विटः
कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे, असल्याची माहिती आशिष शेलारांनी त्यांच्या ट्विटमधून दिली आहे.
पाहा ट्विटः
कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे.
प्रदूषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे लवादाने म्हटलेय.
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 13, 2022
यावेळी आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. सांग सांग भोलानाथ हा दंड पालिकांमध्ये सत्ता असलेल्यांकडून अडीच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन प्रमुखांकडून वसूल करायचा का? असा सवाल करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना टोळा लावला आहे.
पाहा ट्विटः
हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता..
सांग सांग भोलानाथ…
हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून..
अडिच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून..
सोशल मिडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून…
वसूल करायचा का?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 13, 2022
यादरम्यान, प्रदूषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे लवादाने म्हटलेय, असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Eknath Shinde | पैठण येथील सभेनंतर एकनाथ शिंदेंनी शेअर केली पोस्ट, म्हणाले…
- Sandipan Bhumre । “मी कुणाला पैसे वाटले, पुरावे दाखवा”, संदीपान भुमरे यांचं ओपन चॅलेंज
- Sudhir Mungantiwar । स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून उपलब्ध करणार – सुधीर मुनगंटीवार
- Eknath Shinde । “अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात, पण मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांची काम करतो”
- Eknath Shinde । “एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांनो याच साबणानं तुमची धुलाई केली हे विसरु नका”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
