🕒 1 min read
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षाला देखील राजकीय धक्के बसत आहेत. अशातच आता त्यांना नायब राज्यपाल व्हि.के. सक्सेना यांनी मोठा झटका दिला आहे. केजरीवालांना राज्यपालांनी 45 हून अधिक फाईल्स परत पाठवले आहेत.
अरविंद केजरीवाल यांना राज्यपाल यांच्याकडून मोठा झाटकाः
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठवलेल्या फाइल्समध्ये स्वाक्षरी नसल्यामुळे 45 हून अधिक फाईल्स उपराज्यपालांनी परत मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या. यादरम्यान सरकारला या फाईलींवर स्वाक्षरी केल्यानंतरच आपल्याकडे पुन्हा पाठवण्यास सांगण्यात आलं आहे. या स्वाक्षरीच्या वादात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली.
व्हि. के. सक्सेना यांनी 45 हून अधिक फाईल्स परत पाठवल्याः
दिल्लीचे नायाब राज्यपाल व्हि.के सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून फायलींमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेंचं उल्लंघन केल्याचा आरोप केजरीवालांवर केला आहे. फाईल्सवर मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सह्या होत्या. एनएनआय या फाईल मध्ये राष्ट्रीय राजधानीच्या शिक्षण विभाग आणि बोर्डाची संबंधित कागदपत्रांचा समावेश असल्याचा सांगितल आहे.
दरम्यान, स्वाक्षरी करण्याचा नियम मोठ्या प्रमाणात डावलेला जात होता. त्यामुळे सुरळीत आणि प्रभावी कारभाराच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक फाईलवर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आलं आहे. मंत्रालयातील फायलींची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये प्रचलित असलेली ऑफिस प्रणाली लागू करण्याची मागणी ही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Amol Mitkari। काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? काय त्यांचा दौरा? एकदम OK; मिटकरींची सामंतांवर टीका
- kirit somaiya। अनिल परबांचा बंगला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला लावून दिले – किरीट सोमय्या
- Devendra Fadnavis | “विनाश काले विपरीत बुद्धी”; शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर फडणवीसांचा टोला
- Sandip Deshpande | आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे; संदीप देशपांडे यांचा हल्ला
- Ambadas Danve | संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमानंतर अंबादास दानवे यांची खोचक टीका, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
