🕒 1 min read
बेळगाव : बेळगाव सीमाभागात कर्नाटक सरकार आणि स्थानिक पोलिसांची गुंडगिरी सुरू असल्याचे दिसत आहे. सीमावादावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने एकमेकांवर कुरघोडी करत असतानाचा तिथल्या पोलिसांनीही माणुसकीला लाजवेल असे कृत्य केले आहे. मराठी भाषिक तरुणांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवले म्हणून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील मच्छे गावातील हे चार तरुण आहे. या चौघांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवले होते. ‘मराठी भाषिक वाघ आहे’ असा मजकूर लिहिलेले ते स्टेट्स होते. या चारही तरुणांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून कानडी पोलिसांनी जाब विचारला आणि बेदम मारहाण केली. पाठ, हात आणि पायांवर बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे वळ तरुणांच्या अंगावर उमटले आहे.
कानडी पोलिसांकडून सातत्याने मराठी भाषिकांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप स्थानिक मराठी भाषिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार? असा संतप्त नागरिक विचारत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा वाढणार अशी लक्षणे आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. तसेच गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, भगव्या फलकास काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर प्रत्युत्तरात कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘बेळगाव प्रश्नी काही लोकांचा अनावश्यक हस्तक्षेप’, कुमारस्वामींनी शिवसेनेला डिवचले
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
