मुंबई: बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा कर्नाटक सरकारचा रिपोर्ट खोटा आहे. त्यावर ठाकरे सरकार गप्प का? असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरं तर महाराष्ट्र सरकारने त्यावर भूमिका घ्यायला हवी. राज्य सरकार या संदर्भात का गप्प बसलंय हे मला कळत नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने सीमा भागासाठी दोन मंत्री नेमले आहेत. समन्वयक. आधी चंद्रकांत पाटील होते. आता एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ तिथे जाऊन या संदर्भात सीमाभागातील नेत्यांशी चर्चा करणे गरजेचं आहे. पण महाराष्ट्र सरकारला या संदर्भात पाऊल टाकावसं वाटत नसेल तर दुर्देव आहे. मी नक्कीच त्या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलेल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
कर्नाटकात तेव्हा सुरू झालेलं आंदोलन अजूनही सुरू आहे. आंदोलन संपलेलं नाही. त्यावेळी बेळगाव, कारवार निपाणी भालकीसह जवळ जवळ 65 पेक्षा जास्त गावांचा प्रश्न होता. तेव्हाच्या सीमाभागात 60 टक्के ते 65 टक्के मराठी बांधव होते. आजही ती संख्या तेवढीच आहे. फक्त कर्नाटकने या संपूर्ण भागाचं कानडीकरण केलं. बेळगावला उपराजधानी केली. तिथे व्यापार वाढवला. तिथे अनेक मराठी लोकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. अशा तऱ्हेने मराठी टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. तरीही आजही सीमाभागातील बहुमत मराठीच आहे. असे स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विरोधी पक्षनेते जरा उशीरा जागे झाले; पूरग्रस्त पाहणीवरुन जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- ममता बॅनर्जींचा आज होणार फैसला; पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात
- शतकापूर्वीचं ऋतुराजचं सेलिब्रेशन; सर्वांनाचं झाली गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची आठवण
- ‘अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली, आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब?’
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा विनायक राऊतांना विसर; अशोक चव्हाणांना म्हणाले ‘मुख्यमंत्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

