Share

करमाळ्याच्या आमदाराचा दिलदारपणा; कोरोनाग्रस्तांसाठी वेतन देणारा राज्यातील पहिला आमदार

Published On: 

करमाळा : कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्ज असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत शासन करीत आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्था परिश्रम घेत आहे. राज्यातील जनतेनेही शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना संबधित रूग्णासह सर्व शासकीय योजनांसाठी निधीची निश्चितच गरज पडणार आहे.यामुळे करमाळा विधानसभेचे आमदार संजय शिंदे यांनी आपले एक महिन्याचे वेतन सुमारे 2 लाख 10 हजार रूपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे जाहीर केले आहे.

येत्या एक दोन दिवसात ते चेकद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत देणार आहेत. अशा पद्धतीची मदत करणारे ते राज्यातील पहिले आमदार असून राज्यातील तमाम आमदार व खासदार अधिकारी कर्मचारी यांच्यापुढे त्यानी एक आदर्श निर्माण केला आहे.दरम्यान, राज्यभरातील लोकप्रतिनिधींनी आता समोर येवून या सहायता निधीला मदत करणे आवश्यक आहे.’महाराष्ट्र देशा’ तमाम लोकप्रतिनिधी आणि संवेदनशील नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन करीत आहे.

राज्यात आज चार नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासह आता राज्यात कोरोनाग्रस्थांचीवर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या ४ रुग्णांना पैकी ३ पुण्यातील आणि १ साताऱ्यातील असून. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.

राज्यात काल एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला होता तर रात्री उशिरापर्यंत ८ नवे करोना रुग्ण आढळले होते. काल दिवसभरात राज्यात २३ नवे कोरोना ग्रस्थ आढळले त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी देखील लागू करण्यात आली तसेच कालपर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७ वर पोहोचली होती आज तोच आकडा १०१ झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!