मुंबई : अभिनेत्री करीना कपूरने अनेक हिंदी सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने सिनेइंडस्ट्रीत स्वतः ची अशी खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या या बॉलिवूडमधील करियरला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. याविषयी तिने खास सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे.
https://www.instagram.com/reel/CQvxd5YJCVf/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर करीना बरीच ऍक्टिव्ह असते. करीन नेहमीच तिचे आणि मुलगा तैमूरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी तिने तिच्या करिअरला २१ वर्षपूर्ण झाल्याने तिच्या पहिल्या चित्रपटाचे काही सीन्स शेअर केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत करीनाने लिहिले की, ‘२१ वर्षे, ग्रेटफूल, हॅप्पी, मोटिवेटेड, पॅशनेट…२१ वर्ष आणखी मी तयार आहे.’
करीनाच्या या व्हिडिओला अनेक सेलिब्रिटीं आणि चाहत्यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिचं कौतुकही केलं. करीनाने २००० साली ‘रिफ्युजी’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. अभिनेता अभिषेक बच्चन सोबत तिने काम केल होत.
महत्त्वाच्या बातम्या
- भ्याड हल्ल्यानंतर रोहित पवारांचा फोटो ट्विट करून पडळकरांनी नेमके काय दिले आहेत संकेत ?
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- ‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल’
- गीलच्या जागी द्रविडच्या ‘या’ शिलेदाराची वर्णी लागेल का?
- ‘टप्परछाप आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करतायत’


