मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर हे येत्या 14 ते 15 एप्रिल दरम्यान लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्यांनी ज्यादिवशी आपल्या लग्नाची बातमी सर्वांना सांगितली आहे. त्या दिवसापासून त्यांचे चाहते खूप खूश असल्याचं पाहायला मिळतं आहे. याव्यतिरिक्त आलिया आणि रणबीरच्या लग्नाला घेऊन बॉलिवूडमधील इतर कलाकारही उत्सुक असल्याचं दिसून येतं आहे.
तर अशातच बॉलिवूडचे दिग्दर्शक करण जोहरणे आलिया आणि रणबीरला त्याचं लग्न ठरलं म्हणून खास शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देत करणने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट नाचताना दिसून येतं आहेत. ते ज्या गाण्यावर डान्स करत आहेत, ते गाणं ब्रम्हास्त्र या चित्रपटातील आहे. या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर या दोघांनी एकत्रित काम केलं आहे.
तसेच, करणने हा व्हिडीओ शेअर करताना त्यासोबतच एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. त्यामध्ये लिहिलं की, “प्रेम हे प्रकाश आहे आणि मला माहित आहे की तुम्ही प्रेमाच्या सह्याने एमेकांच्या आयुष्यात किती प्रकाश आणला आहे. नवीन सुरुवात आणि बरेच काही.”
दरम्यान, आलिया आणि रणबीरला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये अभिनेता संजय दत्त, तसेच दिग्दर्शक इम्तियाज अली यांसारख्या अनेक कलाकारांनी त्या दोघांच्या लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:


