Share

कन्हैया कुमार यांचा राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. पुढील वर्षी भाजपशासित गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु होती. ‘आम्ही या युवा नेत्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत. कुमार आणि मेवानी या देशातील सत्ताधारी फॅसिस्ट शक्तींना पराभूत करण्यासाठी लढणार’ असे मत काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केले आहे.

कन्हैया कुमारने काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हांपासून कन्हैया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाल्या होत्या. २०१९ साली कन्हैया कुमारनं बिहारमधील बेगुसराय मतदार संघातून भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. तसेच जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनीधी म्हणून त्याची कारकीर्द गाजली होती. देश विरोधी नारे दिल्याच्या आरोपामुळे काही काळ तो वादात सापडला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश राजकारणात काय बदल घडवून आणतो हे पाहण्यासारखे असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!