Share

शाहिनबागसह शेतकरी आंदोलनात दिसणाऱ्या ‘त्या’ आज्जीवर कंगनाची टीका; आता आज्जीनं दिलं सडेतोड उत्तर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकाविरुद्ध पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या २४ दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर त्यांचं आंदोनल सुरू आहे. दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडं या आंदोलनावरून राजकारण देखील चांगलंच तापलं आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध महिलेबाबत ट्विट केलं होतं. ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे.’

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) च्या विरोधात प्रदर्शन करताना शाहीनबागच्या आजी बिल्किस बानो या प्रसिध्दीच्या झोतात आल्या होत्या. त्याच आज्जी शेतकरी आंदोलनात देखील सहभागी झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर कंगनाने ‘शाहीनबागची अशिक्षित आजी, तिला कोणतीही माहिती नसताना आंदोनलनात भाग घेते. अशा पध्दतीनं लोकांचा वापर करुन घेण्यात येतोय हे या लोकांना समजत नाही.’ अशी टीका केली होती. त्यानंतर तिला ट्रॉलर्सनी चांगलंच झापलं होतं.

दरम्यान आता या आज्जींनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कंगनाला मी कधी पाहिलंही नाही. आम्ही शंभर रुपये मिळतात म्हणून आंदोलन करत नाही तर देशाला वाचवण्यासाठी आंदोलन करतोय. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, एका शेतकऱ्याची सून आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झाले. यात माझं सारं आयुष्य गेलंय. गरज पडली तर रस्त्यावर उतरायला आणि अन्यायाविरोधात आवाज कसा उठवायचा हे आम्हाला चांगलं माहित आहे.’ असं त्या म्हणाल्या.

यासोबतच, ‘कंगना देखील आमच्या मुलीसारखी आहे. ती आम्हाला अशिक्षित म्हणाली. आम्ही ज्यावेळी मुलांना जन्म देतो त्यावेळी त्यांना कसं शिक्षण द्यायचं हे देखील आम्हाला माहित आहे. जामिया आणि जेएनयू मध्ये आमच्या मुलांना मारलं त्यावेळी ते आम्हाला सहन झालं नाही. पोलिसांचा हिंसाचार आम्हाला सहन झाला नाही.’ असं सांगत शाहीन बागमधील आंदोलनाचं कारण देखील स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!