Share

पासपोर्ट प्रकरणी अमीर खानवर भडकली कंगना रनौत म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या धडाकेबाज वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. तिच्या या वक्तव्यामुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. मात्र यावेळी ती तिच्या पासपोर्टमुळे चर्चेत आली आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंगनाने मुंबई हायकोर्टात पासपोर्ट नूतनीकरणासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणी दरम्यान कंगनाला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर हा राग आता तिने अभिनेता आमिर खानवर काढला आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने यावेळी असहिष्णुता या मुद्द्यावर बोलताना अभिनेता आमिर खानवर निशाणा साधलाय. याविषयी कू अ‍ॅपवर तिने लिहिले की, ‘महाविनाशकारी सरकारने मला पुन्हा त्रास द्यायला सुरवात केली. माझ्या पासपोर्ट रिन्यूसाठी केलेल्या अर्जाला नाकारण्यात आलं. कारण एका टपोरी-रोडसाईट रोमियोने माझ्याविरोधात देशद्रोहची तक्रार दाखल केली, आणि त्यानंतर माझ्या पासपोर्ट रिन्यूसाठीच्या अर्जात अस्पष्टता असल्याचं कारण देत कोर्टाने तो अर्ज नाकारला…”, असं देखील यावेळी कंगनाने सांगितलं.

याच पोस्टला तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना मात्र तिने अभिनेता आमिर खानवर राग काढला. इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिताना कंगना म्हणाली, ‘लक्षात घ्या…जेव्हा आमिर खान भाजपच्या विरोधात बोलला आणि असहिष्णुताच्या मुद्द्यावर बोलला, त्यावेळी ना कुणी त्याच्या चित्रपटाची शूटिंग नाही थांबवली आणि त्याचा कोणी पासपोर्ट देखील नाकारला नाही.’

२०१५ साली अभिनेता आमिर खानने एका मुलाखती दरम्यान भारतात वाढत चाललेल्या असहिष्णुता मुद्द्यावरील वाद विवादात सहभाग घेतला होता. अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी या दोघांनाही त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या देशात स्थायिक होण्यासाठी नेहमीच सांगितलं जात असल्याचा खुलासा यावेळी अभिनेता आमिर खानने केला होता.

अमीरच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला,त्यानंतर त्याने स्पष्टीकरण देत त्याला म्हणायचं एक होतं आणि त्या वाक्याला घेताना अर्थ वेगळा घेतला गेला, असं बोलून अभिनेता आमिर खानने त्याच्या वक्तव्यावर पांघरून घातलं.

कंगनाने वकील रिजवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केलीय. यात ‘कंगनाला १५ जून ते १० ऑगस्ट या काळात बूडापेस्ट आणि हंगेरीमध्ये प्रवास करायाचा आहे. ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे’. यासाठी कंगनाला प्रवास करणं गरजेचे असल्याचं या याचिकेत सांगण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!