Share

…तर मोहम्मद सिराज असेल पर्याय ; वासिम जाफर यांची प्लेइंग 11

Published On: 

इंग्लंड : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना एक दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. पण अजूनही भारताने आपल्या अंतिम-11 खेळाडूंबाबत निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 टीमची निवड केली आहे. याआधी मांजरेकर यांनी प्लेइंग 11 टीमची निवड केली होती. त्यांनी आपल्या प्लेइंग 11 मध्ये जडेजा आणि इशांत शर्माला त्यांनी स्थान दिले नव्हते मात्र, इंग्लंड मधील वातावरण बघता जाफर यांनी आपल्या संघात या दोघांनाही संधी दिली आहे.

तसेच त्यांनी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीनंतर तर शांत शर्मा आणि मोहम्मद सिराज मध्ये एक पर्याय असेल असे सांगितले. जाफरने सांगितले, “मला असे वाटे की वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांचे स्थान संघात पक्के आहे. ते दोघीही अप्रतिम गोलंदाज आहेत. पण इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज मध्ये एक पर्याय असेल.” तसेच त्यांनी विराट कोहलीने अंतिम सामन्यात थोडे आक्रमक राहावे. असा सल्ला देखील दिला आहे.

जाफर यांची प्लेइंग 11 भारतीय टीम –
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शुभमन गिल, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!