इंग्लंड : आयसीसी आयोजीत जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना एक दिवसावर येउन ठेपला आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मंगळवारी १५ जुन रोजी दुपारी न्युझीलंडने या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बीसीसीआयने देखील या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. पण अजूनही भारताने आपल्या अंतिम-11 खेळाडूंबाबत निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. टीम इंडियाने या सामन्यासाठी पूर्ण तयारी केली आहे, पण इंग्लंडमधलं हवामान आणि खेळपट्टी बघून अंतिम निर्णय घेतला जाईल ‘इंग्लंडमधले हवामान अचानक बदलते, त्यामुळे आम्ही अजूनपर्यंत कोणाला खेळवायचं, याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही अजून दोन सराव सत्र खेळू यानंतर खेळपट्टी बघू आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ.’ असं राहणे म्हणाला आहे.
पुढे राहणे म्हणाला, साऊथम्पटनमध्ये स्लो बॉलर महत्त्वाचे ठरतील, पण बॉल स्विंग होतो, त्यामुळे बॉलरना लवकरात लवकर वातावरणाशी एकरूप व्हावं लागेल, अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- ‘…तरच मला टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळू शकेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा

