Share

महिला IPS अधिकाऱ्यावर कंगणा भडकली म्हणाली, ‘… हे तर आरक्षणाचे दुष्परिणाम’

Published On: 

मुंबई : कंगणा आता थेट कर्नाटकच्या प्रमुख सचिव आयपीएस डी. रूपावर भडकली आहे. सध्या डी. रूपा महिला अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत अली आहे. ट्विटरवर #ShameOnYouIPSRoopa ट्रेंड होतोय. नेटकरी डी. रूपा यांना ट्रोल करत आहेत. ट्विटरवर डी रूपा आणि  ‘True Indology ‘  यांच्यात फटाक्यावरील बंदीवरून जुंपली होती. ‘True Indology ‘ हे पेज हिंदू संस्कृतीबद्दल माहिती देते.

मात्र, रूपा यांनी या पेजवर लोकांना भ्रमित करण्याचा आरोप केला होता. यानंतर ट्विटरने True Indology अकाऊंट सन्पेंड केले होते. ‘True Indology’ चे अकाऊंट ट्विटरने सस्पेंड करताच लोक भडकले होते. डी. रूपा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. रूपा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता. आता कंगना राणौतने डी. रूपा यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले आहे.

यावरच कंगणाने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने डी. रूपा यांना निलंबित करण्याची मागणी केली. ‘आरक्षणाचे दुष्परिणाम. अपात्र व्यक्तिला पॉवर मिळतो, तेव्हा ती व्यक्ति जखमा भरत नाही तर त्या जखमांवरची खिपली काढण्याचे काम करते. मला त्यांच्या (डी. रूपा) खासगी आयुष्याबद्दल काहीही माहित नाही. पण मी गॅरंटीसह म्हणते की, त्यांचे नैराश्य त्यांच्या अकार्यक्षमतेतून जन्मली आहे,’ असे ट्विट कंगनाने केले.

सोशल मीडियावर परखड मत मांडण्यासाठी डी. रूपा ओळखल्या जाणाऱ्या डी. रूपा या कर्नाटक कॅडरच्या 2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हणूनही ओळखले जाते. आपल्या या परखड व दबंग स्वभावामुळे आत्तापर्यंत 41 वेळा त्यांची बदली देखील झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!