Share

कंगनाची उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती

Published On: 

मुंबई:  आभिनेत्री कंगना रणावत सध्या तिच्या आगामी तेजस चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे आहे. यावेळी कंगनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो कंगनाने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी उत्तर प्रदेश सरकारकडून कंगनाला ODOP ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलं.

कंगनाने यावेळी पोस्ट शेअर करत ती म्हणाली,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट खूप छान झाली. योगीजी नेहमीच प्रेरणा देत असतात ते साधे आणि खरे आहेत. इतक्या कमी वयात देशाला लाडका नेता मिळणे म्हणजे भाग्यच आहे, या शब्दांत कंगनाने कौतुक केले आहे. तसेच प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत आणि योगीजींचे साम्राज्य वाढो हीच सदिच्छा, म्हणत कंगनाने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय योगीजींनी श्रीरामजन्मभूमीसाठी वापरले जाणारे एक चांदीचे नाणे भेट दिली आहे.

https://www.instagram.com/p/CUfcsC3BXcw/?utm_source=ig_web_copy_link

ODOP अर्थात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेसाठी कंगनाची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!