Share

मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय – अमोल कोल्हे

Published On: 

🕒 1 min read

पुणे : खासदार अमोल कोल्हे यांनी काल केलेलं एक वक्तव्य सध्या मोठ्याप्रमाणावर चर्चेत आहे. ‘मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री  पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे’, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हेयांनी केलं आहे.

पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत कोल्हे यांनी हे वक्तव्य केलं. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आल्याचं कोल्हे म्हणाले. शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारांच्या सोबत होतो. ते त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा पाहत होते. मी त्यांना न्याहाळत होतो. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीनं अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, ही माझी भावना आहे, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडसाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!