🕒 1 min read
पुणे : खासदार अमोल कोल्हे यांनी काल केलेलं एक वक्तव्य सध्या मोठ्याप्रमाणावर चर्चेत आहे. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत कोल्हे यांनी व्यक्त केली.
आपणाला शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पहायचे असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालावायला लागू नये अशी माझी भावना असल्याचे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार 13 ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 तारखेला मेळावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी हे वक्तव्य केले.
‘मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय’
‘मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे’, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आल्याचं कोल्हे म्हणाले. शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारांच्या सोबत होतो. ते त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा पाहत होते. मी त्यांना न्याहाळत होतो. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीनं अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, ही माझी भावना आहे, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडसाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय – अमोल कोल्हे
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार- अजित पवार
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
