कणकवली: संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर आज कणकवली कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीत पोलिसांकडून त्यांच्यावरील आरोपातील तपासात अजून काम करणे असल्याने, पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. मात्र कोर्टाने ती मागणी फेटाळत त्यांना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
याच न्यायालयीन कोठडीत जामिन मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिन अर्ज केला आहे. हा जामिन अर्ज कोर्टाने स्वीकारला असून त्यावरची सुनावणी उद्यावर राखून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना आजची रात्र न्यायायलिन कोठडीतच काढावी लागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक कालावधीत सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर गुंड पाठवून हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी अटक पुर्व जामिन अर्ज केला होता. कोर्टाने तो जामिन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर ते २ फेब्रुवारी रोजी पोलिसांना शरण गेले होते.
महत्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंची प्रकृती बिघडली; रुग्णालयात ठेवण्याची वकिलाची मागणी
- “वाईन पिऊन एकदा सरळ चालून दाखवावं…” सुजय विखे पाटलांचा टोला
- चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले पुत्रशोक झालेल्या आमदार विजय रहांगडालेंचे सांत्वन
- पाकिस्तानच्या अजून एका जलतगती गोलंदाजावर बंदी
- ऐतिहासिक औरंगाबादला ८ दिवसाला पाणीपुरवठा; सरकारमधील मंत्री काय करतात? राज्यपाल कोश्यारी यांची खंत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
