गोंदीया : वर्धा-देवळी मार्गावर २५ जानेवारी रोजी पुलावरुन गाडी कोसळून झालेल्या अपघातात आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. वर्धा-देवळी मार्गावरील सेलसुरा येथे पुलावरून झायलो ४० फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये भाजपा आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश होता. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे ( BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी आज आमदार विजय रहांगडाले यांची भेट घेत सांत्वन केले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनीही गोंदियाचे आमदार विजय राहंगडले यांच्या गोंदियातील खामरी येथील निवासस्थानी जाऊन रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन (Chandrasekhar Bavankule pays homage to MLA Vijay Rahangdale) केले. असे ट्वीट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत गोंदियाचे आमदार श्री विजय राहंगडले जी यांच्या गोंदियातील खामरी येथील निवासस्थानी जाऊन रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन केले. 1/2 pic.twitter.com/yZnM8AT3ss
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 4, 2022
आमदार विजय रहांगडाले यांचा अविष्कार हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने विजय रहांगडाले तसेच परिवाराला मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांची भेट सांत्वन केले होते. आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेत सांत्वन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- VIDEO : अरेच्चा! शहनाज गिलची ‘ती’ स्टाईल अल्लू अर्जुनने तर केली नाही ना कॉपी?
- दलितांवर पुन्हा पाण्यासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली
- “वापरा आणि फेकून द्या हे भाजपचे धोरण…” एकनाथ खडसेंची टीका
- ओवेसींवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध; कठोर कारवाई करण्याची खासदार जलील यांची लोकसभेत मागणी!
- यूपीए सरकारने साखर कारखान्यांना कर्ज घेण्यास भाग पाडलं – सुजय विखे पाटील

