Share

ऐतिहासिक औरंगाबादला ८ दिवसाला पाणीपुरवठा; सरकारमधील मंत्री काय करतात? राज्यपाल कोश्यारी यांची खंत!

Published On: 

औरंगाबाद: ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आठ दिवसात पाणी येते जेव्हा ही गोष्ट राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कळली तेव्हा त्यात एक वाजता असलेल्या शहरातील आठ दिवसात पाणी येते ही खेदाची बाब असल्याची खंत त्यांनी औरंगाबाद दौऱ्यात व्यक्त करत शहरातील लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री काय करतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भगतसिंग कोशारी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात अधिकार्‍यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत सैनिकी विभाग, रेड क्रॉस, मानव विकास, मराठवाडा विकास मंडळ या विभागांचा आढावा घेतला

यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद निलेश गटणे आदींची उपस्थिती होती. तसेच आमदार अतुल सावे, हरिभाऊ बागडे आणि संजय केणेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी आमदार सावे यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेबाबत भगतसिंग कोश्यारी यांना माहिती दिली. ते म्हणाले, शहरात १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र यात कुठलीही प्रगती नाही. यावर राज्यपालांनी शहरातील पाणी समस्येबाबत आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आठ दिवसात पाणी येणे ही गोष्ट खेदजनक आहे शहरातील लोकप्रतिनिधी तसेच सरकारमधील मंत्री काय करत आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारला लगावला. यावेळी शहरातील विविध समस्यांबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी कोषारी यांच्यासमोर पाढा वाचला. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने शहरात पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना घरे मिळाली नसल्याच्या समस्येकडे लक्ष वेधून घेतले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांचा आढावा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे घेतला.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!