दिल्ली: महाराष्ट्र सरकारकडून वाईनला किराणा दुकानात विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाईनला किराणा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीच्या या निर्णयावर भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून टीका होतचं होती. पण यात आता भाजपचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटलांची भर पडली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की,’पंतप्रधान मोदींमुळेच साखर कारखाने टिकले आहेत. पेट्रोलवरचा कर अनेक राज्यांनी कमी केला महाराष्ट्राने कमी केला नाही. आर्थिक स्थितीमुळे महाराष्ट्राने घेतला नसेल मी समजू शकतो, पण वाईन साठी एवढी घाई का? जर वाईनमध्ये अल्कोहोल नाही, असं वाटत असेल तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी ती पिऊन एकदा सरळ चालून दाखवावं.
याशिवाय भाजपा खासदार सुजय विखे पाटील लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर संसदेतसुद्धा बोलले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चांगलाच वाद रंगला. यावेळी सुजय विखे पाटील यांनी सहकार साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

