🕒 1 min read
सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane) यांना संतोष परब हल्ला प्रकरणी आज सिंधुदुर्ग न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांनी ही सुनावणी केली आहे.
आता नितेश राणे यांची प्रकृती अस्वस्थ (Nitesh Rane health deteriorates) असल्याचा अर्ज त्यांच्या वकिलाने कारागृह अधीक्षकांना दिला आहे. रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणात नितेश राणेंना ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान राणेंना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याविरोधात त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याआधीच त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती वकिलाने कोर्टात दिली आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग कोर्टाने त्यांचा अटक पूर्व जमीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पोलिसांना शरण जात स्वतःला स्वाधीन करून दिले होते. त्यानंतर त्यांना २ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक काळात त्यांनी गुंड पाठवून हल्ला घडवून आणला होता.
महत्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्राच्या चित्ररथाला पुरस्कार; अमोल कोल्हे यांनी केले सहभागी कलाकार, कारागीरांचे अभिनंदन
- पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंदिरात भाविकांची गर्दी
- अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला ‘सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ’ पुरस्कार
- नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी
- संसदेत बोलताना सुप्रिया सुळेंचा उडाला गोंधळ; म्हणाल्या, ‘खाल्ल्या मिठाला जागू…’


