🕒 1 min read
नागपूर : महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणारे कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) अडचणीत आले आहेत. कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटले. दरम्यान या प्रकरणाला आता राजकीय वळण लागत आहे. नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एका नगरसेवकाने ‘कालीचरण महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. यावरून सभागृहात काही वेळ सत्ताधारी व विरोधक यांच्यात काही वेळ शाब्दिक चकमकही झाली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सुरेश भट सभागृहात (Suresh Bhat Hall) आयोजित करण्यात आली होती. वंदेमातरम् गायनाने कामकाजाला सुरुवात होताच काही सदस्यांनी महात्मा गांधी की जय, अशा घोषणा दिल्या. तर सत्ताधारी नगरसेवकाने कालीचरण महाराज की जय, अशा घोषणा दिल्या. यावर काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी आक्षेप घेतला. विकृत मनोवृत्तीच्या महाराजांचा सभागृहात जयघोष होत असेल तर यातून त्यांची मानसिकता काय आहे. हे निदर्शनास येते, असे म्हणत या घटनेचा निषेध केला.
यावर कालीचरण महाराजांचा जयघोष कुणीही केला नाही, असे सत्ताधरी पक्ष नेते यांनी स्पष्ट केले. यावर पीठासीन महापौर मनीषा धावडे यांनी कालीचरण महाराजाचा जयघोष केला असेल तर हे वक्तव्य रेकॉर्डवरून काढण्याची सूचना केली.
धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज यांना रायपूर पोलिसांनी अटक केली आहे, असे असतानाही अशा वादग्रस्त महाराजांचा जयघोष सभागृहात झाल्याने मनपातील कालीचरण महाराजांचा भक्त कोण, अशी चर्चा मनपा वर्तुळात आहे.
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेवढ्या ऑक्सिजनची गरज होती त्यापेक्षा तिप्पट…- अजित पवार
- वक्फ बोर्डाची धडक कारवाई; मशिदीच्या साडेआठ एकर जमिनीचा घेतला ताबा
- अजित पवार राणेंची अक्कल काढायला सिंधुदुर्गात का गेले; प्रविण दरेकरांची पवारांवर टीका
- राज्यपालांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले; मुंबई मनपातील आश्रय योजनेच्या चौकशीचे दिले आदेश
- “माझ्या कारकिर्दीत अनेक खलनायक”; धोनीनंतर आता भज्जीचे बीसीसीआयवर गंभीर आरोपृ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
