Share

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेवढ्या ऑक्सिजनची गरज होती त्यापेक्षा तिप्पट…- अजित पवार

Published On: 

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे २०२२ वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काय करता येईल? यासंदर्भात भाष्य केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दुसरी लाट संपली तेव्हापासूनच आम्ही याविषयी आढावा घेत होतो. तसेच सर्व जिल्हाधिकारी, आरोग्य विभागांना तिसरी लाट येणार हे गृहित धरून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधे बेड यांची तजवीज करा असे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजन लागलेला असून त्याच्या तिप्पट ऑक्सिजनची व्यवस्था आपापल्या भागात करावी, असे आम्ही सांगितले होते, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पहिल्या डोससंदर्भात नागरिक जागरुक होते. परंतु आता दुसऱ्या डोसबाबत नागरिकांना गांभीर्य येत नाही. ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे घरोघरी जाऊन तपासणी करुन लसीकरण करायला सांगण्यात आले आहे’, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!