मुंबई : मुंबई महापालिकेत आश्रय योजनेत घाटाळा झाल्याची तक्रार भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे केली होती. याप्रकरणी राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. हा शिवसेनेला मोठा धक्का समजला जात असून राज्यपाल आणि शिवसेना यांच्यातील वाद यानिमित्ताने पुन्हा उफळून आल्याची चर्चा आहे.
यापूर्वी राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरुन ठाकरे सरकारवर तोशोरे ओढले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकमेकांवर केलेले ‘लेटर वॉर’ हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. आता राज्यपालांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्याने हा शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा (MLA Mihir Kotecha) आणि काही नगरसेवकांनी केला होता. भाजपच्या शिष्टमंडळाने याबाबत राज्यपालांना भेटून चौकशी करण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्यात येणार आहेत.
सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आतापर्यंत १ हजार ८४४ कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपने त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.
महत्वाच्या बातम्या
- ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात कोरोनाची तीसरी लाट! “…तर ८० हजार मृत्यू”, अतिरिक्त मुख्य सचिवांचा खुलासा
- ‘… त्यामुळे छोटे मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करताय’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “…पंतप्रधानांविरुद्ध गरळ, उसना आव आणि म्याव म्याव”, भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
- “म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची…”; सदाभाऊ खोतांची नवाब मलिकांवर बोचरी टीका


