Share

वक्फ बोर्डाची धडक कारवाई; मशिदीच्या साडेआठ एकर जमिनीचा घेतला ताबा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: राज्यातील वक्फ जमिनीचा खालसा करून खरेदी-विक्री करणे, वक्फ जमिनींचा गैरव्यवहार व अवैधरित्या ताबा करणे अशा गैरकृत्य करणाऱ्यां विरोधात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातर्फे धडक कारवाई करण्यात येत आहे. अशाच एका प्रकरणात औरंगाबाद जिल्ह्यातील शेकट्या जवळील मशिदीच्या साडेआठ एकर जमिनीचा वक्फ मंडळातर्फे ताबा घेण्यात आला. अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी दिली.

रांजणगाव  बिडकीन येथील गट न.१२० मध्ये मशिदीची एकूण ८ एकर जमिन आहे. या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून सूर्यभान पवार, किशोर बद्री भवार, विष्णू भवर, बरकू भवार, बरिगाबाई भवार, शिवाजी भवार व अशोक बर्वे यांनी अनधिकृतपणे ताबा केला होता.

त्या विरुद्ध मशिदीचे मुतवल्ली शेख नासिर व इतर यांनी वक्फ अधिनियम १९९५ चे कलाम ५४ अन्वये वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुनावणी घेऊन ही जमीन रंजन खुरी येथील मशिदीची जागा आहे असा निर्णय दिला. ३१ डिसेंबर रोजी जागेचा ताबा मंडळ अधिकारी, लोहगाव तलाठी, पोलीस यांच्या मदतीने वक्फ मंडळाचे जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद फैज यांनी अतिक्रमण निष्कसित करून ताबा घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!